PostImage

Bahujnancha Buland Aawaj

March 7, 2024   

PostImage

महाशिवरात्रीच्या महापूजेचा संत मुरलीधर महाराज यांना मिळाला बहुमान


विदर्भाचे काशी म्हणून ओळखलं जाणारा तीर्थक्षेत्र मार्कंडादेव येथे हेमांड पंथी मार्कंडेश्वराची महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे ४.०० वाजता हरणघाट पारडी पिठाचे पिठाधिश श्री मुरलीधर महाराज यांच्या हस्ते महापूजेचा कार्यक्रम होणार आहे, म्हणजे ही एक अभीमानाची गोष्ट आहे.

 खास म्हणजे मार्कंडेश्वराच्या जिर्णोद्वाराचे बांधकाम पूर्ण करावे ही मागणी घेऊन संत मुरलीधर महाराज 14 दिवसापासून मार्कंडा देव येथे आंदोलन करीत आहे.श्री राम प्रभू रामचंद्र यांनी जसा १४ वर्षे वनवास भोगला त्याचप्रमाणे बाबांनी 14 दिवस आंदोलन करून जिर्णोद्वाराचे बांधकाम पूर्ण करण्यास शासनाला भाग पाडले.श्री संत मुरलीधर महाराज यांना महापूजेचा मान मिळणे स्वाभाविक आहे.

त्यायोगी पुरुषाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपला देह परमेश्वराच्या स्वाधीन करण्याच्या महान कार्य संत मुरलीधर महाराजांनी करून सुस्थावलेल्या प्रशासनाला जागे केले, अशा त्यागी संत पुरुषाच्या वर्णन मी शब्दात करू शकत नाही इतके माहान कार्य बाबांनी केले.

अरे माझा बाप इथे उघड्यावर पडलाय तर मी स्वस्थ कसा बसेल,हे ब्रीदवाक्य बाबांनी घेवून जिर्णोद्वाराच्या बांधकामाला सुरुवात करायला शासनाला भाग पाडले.

महाशिवरात्री निमित्त मार्कंडादेव येथे लाखो भक्त मार्कंडेश्वराच्या दर्शनाकरिता ये जा करत असतात अशा भक्तिमय वातावरणात,भक्तीत दंग होऊन,भक्त न्याहून जातात,अशा भक्तिमय वातावरणात मार्कंडेश्वराच्या महापूजेचा मान आज संत मुरलीधर महाराज यांना मिळतो आहे,ही अभिमानाची गोष्ट आहे.बाबा तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.